आमच्याबद्दल
क्रिप्टो क्रांती अकॅडमी ही महाराष्ट्रातील एकमेव ब्लॉकचेन, वेब3 आणि क्रिप्टो मार्केट बद्दल मराठी मधून शिक्षण देणारी डिजिटल शैक्षणिक संस्था आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे सामान्य मराठी जनतेला क्रिप्टो मार्केटमधील संधी समजावून देणे, त्यांना सुरक्षित गुंतवणुकीचे मार्गदर्शन करणे आणि जागतिक स्तरावरील डिजिटल फायनान्स क्षेत्रात सहभागी होण्यासाठी सक्षम बनवणे.
आमचे संस्थापक आणि प्रशिक्षक – अभिजीत सूर्यवंशी
क्रिप्टो क्रांती अकॅडमीचे संस्थापक अभिजीत सूर्यवंशी हे 2019 पासून क्रिप्टो मार्केट मध्ये ट्रेडिंग आणि गुंतवणूक करत आहेत. त्यांनी हजारो लोकांना युट्युब, इंस्टाग्राम आणि क्रिप्टो क्रांती अकॅडमीच्या माध्यमातून क्रिप्टोकरन्सी, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी, NFT, मेटाव्हर्स आणि वेब3 या विषयांवर मार्गदर्शन केले आहे. अभिजीत सूर्यवंशी यांनी 2022/23 मध्ये त्यांच्या अनुभवाच्या जोरावर महाराष्ट्रात क्रिप्टो करन्सीच्या नावाखाली सुरु असलेले 3000 कोटींचे स्कॅम उघडकीस आणले होते. त्यांचा अनुभव, अभ्यास आणि साधेपणाने शिकवण्याची शैली हीच क्रिप्टो क्रांती अकॅडमीची खरी ताकद आहे.
आमचे ध्येय-
- मराठीतील प्रत्येक तरुणाला क्रिप्टो व वेब3 क्षेत्रात शिक्षित करणे.
- ब्लॉकचेन आणि क्रिप्टो मार्केट बद्दल साक्षरता वाढवून, स्वतःचे डिजिटल भविष्य घडवण्यासाठी मार्गदर्शन करणे.
Enterprise customer
Accurate Course
Languages
Instructors
क्रिप्टो क्रांती अकॅडमी –शिका, समजून घ्या आणि क्रिप्टो मार्केट क्षेत्रात आत्मविश्वासाने पाऊल टाका!
- ब्लॉकचेन तंत्रज्ञानाची मूलभूत माहिती
- क्रिप्टो मार्केट म्हणजे काय?
- क्रिप्टो मधून पॅसिव्ह इन्कम मिळवण्याचे मार्ग
- NFT म्हणजे काय व त्याचे उपयोग
- Web3 आणि मेटाव्हर्स जग
- क्रिप्टोमध्ये सुरक्षित गुंतवणूक कशी करावी
- मार्केट अॅनालिसिस, ट्रेडिंग स्ट्रॅटेजी आणि बरेच काही
- मराठीतून सखोल आणि समजेल अशा पद्धतीने शिक्षण
- अनुभवी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन
- अपडेटेड अभ्यासक्रम
- ऑनलाईन वर्कशॉप्स आणि डेमो ट्रेडिंग
- सुरक्षेवर आधारित प्रॅक्टिकल शिकवण
- ऑनलाईन कोर्सेस (Live + Pre-recorded)
- मराठीतून प्रॉपर स्टडी मटेरियल
- ट्रेडिंग डेमो वर्कशॉप्स
- एक-ते-एक मार्गदर्शन (1:1 Mentorship)
- क्विझ, प्रोजेक्ट्स व फायनल टेस्ट
- कोर्स पूर्ण झाल्यावर प्रमाणपत्र (Certificate)
आम्ही कोणासाठी आहोत?
- विद्यार्थी – जे डिजिटल इंडस्ट्रीत करिअर करू इच्छित आहेत
- गृहिणी किंवा नॉन-टेक पार्श्वभूमीतील लोक – ज्यांना नवीन कौशल्य आत्मसात करायचे आहे
- इन्व्हेस्टर्स – जे सेफ आणि नफा देणारी गुंतवणूक शोधत आहेत